केवटी: भाजपचे आमदार डॉ. मुरारी मोहन झा यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या रैयाम साखर कारखाना आणि हाजीपूर केवटी येथील खादी ग्रामोद्योग संघाला सुरु करण्यासाठी बिहार सरकारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही समस्यांबाबत त्यांनी विस्तृत चर्चा केली. लवकरच या दोन्ही संस्था सुरू करण्याची मागणी केली.
ते म्हणाले, जर रैयाम साखर कारखाना आणि खादी ग्रामोद्योग सुरू झाला तर या विभागातील हजारो शेतकरी, रोजगार मिळवू शकतील. युवक आणि महिलांना रोजगार मिळू शकेल.
उद्योग मंत्र्यांनी या दोन्ही संस्था लवकरात लवकर सुरू केल्या जातील असे सांगितले. साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला रैयाम साखर कारखाना १९९५ मध्ये आर्थिक स्थिती बिघडल्याने तसेच जुन्या मशीनरी, उत्पादन क्षमता घटल्याने बंद केले होते. त्यामुळे हजारो कामगारांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना उसाबाबत अडचणी आल्या. तशाच पद्धतीने हाजीपूर ग्रामोद्योग बंद झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला. या प्रयत्नांसाठी स्थानिक नागरिकांनी आमदारांचे आभार मानले.