सीतामढी : शहरातील गांधी मैदान शहीद स्मारक या ठिकाणी बुधवारी ऊस उत्पादक संघाकडून शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रीगा साखर कारखान्याशी संबंधीत 40 हजार शेतकरी आणि 700 कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हस्तक्षेप करावा असा आग्रह केला आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष नागेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, रीगा सागर कारखान्यातून सीतामढी बरोबर शिवहर व मुजफ्फरपूर चे जवळपास 40 हजार शेतकरी जोडलेले आहे. गेल्या चार पाच वर्ष्या पासून ऊस शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ना वेळेत ऊसाची खरेदी होत आहे आणि ना ऊसाचे पैसे वेळेत दिले जात आहेत.गेल्या हंगामाची जवळपास 125.30 करोड रुपये थकबाकी कारखान्याकडून देय आहे. बँकाकडून केसीसी मद्ये करोडो रुपये अडकले आहेत. एका कारखान्याचे प्रमुख निदेशक ओमप्रकाश धानुका यांनी सार्वजनिक पद्धतीने विडियो जाहीर करुन आर्थिक स्थिती ठीक नसल्याची माहिती दिली आहे. अशा स्थितीमध्ये चालू हंगामात हे शक्य होणार नाही. यानंतर ऊस शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. यावेळी डॉ. ब्रजेश कुमार शर्मा, अवधेश कुमार सिंह, गुणानंद चौधरी, लखनदेव ठाकूर, शशिभूषण, मदन मोहन ठाकुर, कामेशनंदन सिेंह, रामजपू प्रसाद, रामश्रेष्ठ सिंह, अभिराज पटेल, अवधेश नायक, गंगाप्रसाद सिंह, श्याम बिहारी पंडित आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.