कर्नाल : मेरठ रोडवरील सहकारी साखर कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. त्याशिवाय, कारखान्याच्या ३५०० टीसीडी साखर यंत्राचे ५००० टीसीडीचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, साखर रिफायनरीसह १८ मेगावॅट को-जनरेशन यंत्रणेचेही उद्घाटन यावेळी केले जाणार आहे. या आधुनिकीकरणावर २६३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल, खासदार संजय भाटिया, हरियाणा राज्य साखर कारखाना संघाचे
अध्यक्ष तथा शाहाबादचे आमदार रामकरण, घरौंदाचे आमदार हरविंद्र कल्याण, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजीव कौशल आणि हरियाणा शुगरफेडचे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र कुमार उपस्थित राहणार आहेत.
उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी आमदार हरविंद्र कल्याण, पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया आदी उपस्थित होते. इंद्री गावातील बीबीपूर जाटान येथे तीन कोटी रुपये खर्चून ३३ केव्ही विद्युत सबस्टेशन, असंध कॉलेज रोडवरही असेच सब स्टेशन, निलोखेडी विभागातील तरावडी येथे दोन कोटी ५७ लाख रुपये खर्चून अग्निशमन भवन, गप्पूवाला बाग, अटल पार्क, दहा रस्त्यांचे डांबरीकरण, पश्चिम यमुना तिरावर सहा घाटांची निर्मिती या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे.