नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे मागणीत घट झाल्याने भारतीयांकडून २०२०-२२ या कालावधीत ५ टक्के साखरेची वापार कमी होईल अशी माहिती साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे या कालावधीत २.६ मिलियन टन साखरेचा खप कमी होणार आहे.
लग्न समारंभ, पार्टीसारख्या मोठ्या कार्यक्रमांवरील निर्बंधांचा हा परिणाम असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय देशातील बहुतांश भागात उन्हाळ्याच्या कालावधीत लागू झालेल्या लॉकडाउनमउळे साखर विक्रीवर परिणाम झाला आहे. आईस्क्रीम, कोल्ड्रींकची विक्री लक्षणीय पद्धतीने घटली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी देशात साखरेचा एकूण खप सुमारे ६० टक्के आहे.
श्री रेणुका शुगर्सचे अध्यक्ष रवि गुप्ता यांनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनद्वारा आयोजित एका वेबिनारमध्ये बोलताना सांगितले की, २०२०-२१ म्ये २६.६३ मिलियन टन साखरेचा खप अपेक्षित होता. प्रत्यक्षात मागणी १.२ मिलियन टनाने कमी होऊन २५.४ मिलियन टनावर आली. २०२१-२२ मध्ये २७.१६ मिलियन टनाच्या अपेक्षित मागणीच्या तुलनेत यामध्ये १.४ मिलियन टनाची घट होईल. २५.८ मिलियन टन साखरेचा खप होण्याचा अंदाज आहे. अशाच पद्धतीने २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत साखरचा खप २.६ मिलियन टनाने कमी होऊन ५३.७९ मिलियन टन विक्रीच्या तुलनेत ४.८३ टक्क्यांनी कमी असेल.