रुडकी : कार्यक्षेत्रातील ऊस संपत आल्याने इक्बालपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्याला उसाची टंचाई भासत आहे.
साखर कारखान्यात उसाची आवक कमी झाल्याने कारखाना सुमारे २४ ते ३० तास नो केन अशा स्थितीतून जात आहे. ऊस कमी असल्याने बुधवारी पुन्हा कारखाना बंद करावा लागला. ऊस विभागाचे व्यवस्थापक ओमपाल सिंह तोमर यांनी सांगितले की, कारखान्याला होणारा उसाचा पुरवठा अतिशय कमी झाला आहे. पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यावरच गाळप सुरू केले जात आहे. जर अशीच स्थिती कायम राहीली तर एक ते दोन दिवसात कारखाना बंद केला जाईल असे तोमर यांनी सांगितले. सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ऊस दिसून येत आहे, तो लावणीसाठी शिल्लक ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.