मोदीनगर: मोदी शुगर मिल मध्ये 2019-20 चा गाळप हंगाम आज म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता समाप्त होईल. शेतकऱ्याकडून निर्धारित वेळेत ऊस कारखान्यापर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. गाळप हंगाम समाप्ती बाबत ऊस समिती, ऊस विकास परिषद आणि कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने नोटीस देण्यात आली आहे.
मोदी शुगर मिल मध्ये 17 ऑक्टोबरपासून 2019-20 चा ऊस गाळप हंगाम सुरु झाला होता. सोमवारी ऊस समिती तसेच ऊस विकास परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसी मध्ये सांगितले आहे की, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक डॉ. रामफल आणि सहकारी ऊस विकास समितीचे सचिव अजय प्रताप सिंह द्वारा मोदी शुगर मिल परिक्षेत्राचा दौरा करण्यात आला. क्रय केद्रांवर आता ऊस पोचत नाही. या शिवाय ज्या शेतकऱ्यांकडून ऊस कारखाना गेटवर ऊस पुरवठा केला जात आहे त्या शेतकऱ्यांकडूनही ऊस संपत आल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच ऊस गाळप हंगाम 26 मे अर्थात आज संध्याकाळी 7 वाजता संपेल. ज्या शेतकऱ्यांजवळ पुरवठा योग्य ऊस आहे त्यांनी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कारखाना गेट वर पुरवठा करावाअसे सांगण्यात आले. ऊस विकास समितीचे सचिव अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, सोमवारी जलालाबाद, हिसाली आणि दुहाई परिसराचा दौरा केला होता. ज्यामध्ये शेतकऱ्यांनी पुरवठा योग्य ऊस संपल्याची माहिती दिली आहे. मोदी शुगर मिल चे उपाध्यक्ष वेदपाल सिंह मलिक यांनी सांगितले की, गाळप हंगाम 2019-20 मध्ये ऊस गाळपाचे लक्ष्य 90 लाख क्विंटल होते. 25 मे पर्यंत 90.59 लाख क्विंटल इतके गाळप केले आहे. कारखान्यामध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा ऊस संपला आहे. तरीही जर कुठल्या शेतकऱ्याकडे ऊस असेल तर त्यांनी मंगळवारी संध्याकाळी सात वाजता कारखाना गेटवर आणावा, असेही त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.