सहारनपूर: सरसावा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची रविवारी समाप्ती झाली. साखर कारखान्याने यंदा आपल्या उद्दीष्टापेक्षा अधिक १ लाख ७० हजार क्विंटल जादा उसाचे गाळप करून हंगाम समाप्त केला.
शेतकरी सहकारी साखर कारखान्याने तब्बल ६ महिने १८ दिवसांचा गाळप हंगाम चालवून रविवारी गाळप बंद केले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक व्ही. पी. पांडे आणि मुख्य लेखापाल सौरभ बन्सल यांनी सांगितले की, गळीत हंगाम आता समाप्त करण्यात आला आहे. कारखान्याने यावर्षी ४७ लाख क्विंटल उसाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, साखर कारखान्याने एक लाख ७० हजार क्विंटलपेक्षा जास्त ऊस गाळप करून नवा विक्रम नोंदविला आहे. कारखान्याने १०.३५ टक्के साखर उताऱ्यासह साखर कारखान्यात ४८ लाख ७० हजार क्विंटल उसाचे गाळप करून ५ लाख ३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसापैकी १४ जानेवारी २०२१ अखेर सर्व पैसे देण्यात आले आहेत.