दसर्‍यानंतर सुरु होणार साखर कारखान्यांचा गाळप हंगाम

शामली, उत्तर प्रदेश: दसर्‍यानंतर साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप हंगाम सुरु करण्याची तयारी सुरु आहे. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम बजाज समूहाचा थानाभवन कारखाना 27-28 ऑक्टोबर, शामली कारखाना 29-30 ऑक्टोबर आणि उन कारखाना दोन नोव्हेंबर ला गाळप हंगाम सुरु करेल. कारखाना अधिकार्‍यांनी सांगितले की, लवकर गाळप हंगामाचा मुहुर्त काढून हंगामाची तिथीही जाहिर केली जाईल.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये नव्या गाळप हंगामासाठी दोन महिन्यापासून तयारी सुरु आहे. कारखान्यांमध्ये 70 ते 85 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील उन कारखान्यात 85 टक्के, थानाभवन आणि शामलीमध्ये 70 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाळप हंगामाकडे पाहता यावेळी प्रदेश मुख्यालय लखनौमध्ये मंडलवार ऊस सुरक्षण बैठक अजूनपर्यंत झालेली नाही, जी गेल्या वर्षी दहा ते वीस सप्टेंबर पर्यंत झालेली होती. यंदा ऊस समिती स्तरीय शेतकरी बैठकाही आयोजित केल्या नाहीत. ऊस विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ऊस समिती स्तरीय बैठका गर्दी होईल या भितीने आयोजित करण्यात येणार नाहीत.

उन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले की, उन कारखाना एक ऑक्टोबर नंतर ऊसाची रिकवरी टेस्ट करेल. कारखान्याकडून 83 ऊस वजन केंद्रांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. दोन नोव्हेंबर पर्यंत साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करेल. सध्या कारखान्याने बॉयलर पूजन आणि नव्या गाळप पूजनाच्या तिथीचा मुहूर्त काढलेला नाही. बजाज समूहाच्या थानाभवन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक जेबी तोमर यांनी सांगितले की, कारखान्याचे 70 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. कारखान्यांकडून ऊस वजन केंद्रांची दुरुस्ती केली जात आहे. कारखान्याच्या बॉयलर पूजन आणि गाळप पूजनाची तिथी जाहिर करण्यात येईल. शामली कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया आणि ऊस विभागाचे सिनियर मैनेजर दीपक राणा यांनी सांगितले की कारखान्याच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह यांनी सांगितले की, गेल्या ऊस गाळप हंगामात थानाभवन कारखाना एक नोंव्हेंबर, शामली पाच नोव्हेंबर आणि उन कारखाना नऊ नोव्हेंबर ला सुरु झाला होता. यावेळी थानाभवन कारखाना 27-28 ऑक्टोबर आणि शामली 29-30 ऑक्टोबर आणि उन दोन नोव्हेंबर ला गाळप हंगाम सुरु करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here