शामली: थानाभवन साखर कारखान्याचा गाळप हंगाम रविवारी रात्री संपुष्टात आला. गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी ऊसाचे गाळप झाले आहे. तर ऊन कारखानाही आता बंद होण्याची शक्यता आहे.
थानाभवन साखर कारखान्याने ३० एप्रिल आणि ऊन कारखान्याने २९ एप्रिल रोजी गाळप बंद करण्याची नोटीस जारी केली होती. मात्र उसाची आवक सुरू राहिल्याने या कालावधीत कारखाना बंद झाला नाही. थानाभवनचे महा व्यवस्थापक जे. बी. तोमर यांनी सांगितले की रविवारी दिवसभर ऊस पुरवठा झाला नाही. संध्याकाळी थोडे गाळप झाले. परिसरातील स्थिती पाहता रात्री गाळप सत्र समाप्ती करण्यात आली. एकूण १३४ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. गेल्या हंगामात १५२ लाख टन ऊस गाळप झाले होते.
दरम्यान, साखर कारखाने ऊस बिले देण्यास उशीर तसेच टाळाटाळ करीत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना ऊस विकला आहे. ऊन कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी नो केन अशी स्थिती होती. गावांना सायंकाळी सात वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली. आता गाळप बंद केले जाईल.
जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस संपल्यानंतरच कारखाना बंद होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे शामली सहकारी ऊस विकास समितीने ऊस उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मोबाइल नंबर प्रसिद्ध केले आहेत. शेतकऱ्यांनी जर गरज असेल तरच कार्यालयात यावे. अन्यथा फोनवरूनच संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.