थानाभवन साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू

शामली : बजाज हिंदुस्थान समूहाच्या थानाभवन साखर कारखान्याच्या २०२१-२२ या हंगामातील गाळपास विधीवत सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष वीरपाल सिंह यांच्यासह कारखान्याच्या अधिकारी, शेतकऱ्यांनी गव्हाणीत मोळी टाकून नव्या हंगामाला सुरुवात केली. यावेळी कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी, बैलगाडीधारक, ट्रॅक्टर-ट्रॉली धारकांनाही सत्कार करण्यात आला. पहिले दोन दिवस पुरेसा ऊस न मिळाल्याने कारखाना सुरू होऊ शकला नाही.

रविवारी कारखान्याच्या परिसरात २४ तासांचे रामायण पठण करण्यात आले. पंडित राजकमल भट्ट यांनी हवन केले. कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष वीरपाल सिंह, वरिष्ठ महाव्यवस्थापक जंगबहाद्दूर तोमर यांनी बैलगाडीतून ऊस आणणारे शेतकरी, पहिला ट्रॅक्टरधारक शेतकरी, रसूलपूरचे अब्दुल मलिक व रायपूरचे शेतकरी हरिकिसन यांचा शाल, गूळ देऊन सत्कार केला. कारखान्याच्या इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख श्रवण चौहान, प्रॉडक्शन विभागाचे प्रमुख आमोद बिष्णोई, लेखा विभागप्रमुख सुभाष बहुगुणा, एचआर विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक शिवचरण सिंह, ऊस व्यवस्थापक रुपेश पुंडीर, कोमल सिंह, संदीप उपस्थित होते. २६०० क्विंटल ऊस आल्याचे वीरपाल सिंह यांनी सांगितले. दहा हजार क्विंटल ऊस आल्यावर गाळप सुरू होईल. कारखान्याने १.०१ लाख क्विंटलचे इंडेंट जारी केल्याचे सहायक ऊस महाव्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here