मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश: ऊस गाळप हंगाम आता सुरु होत आहे,साखर कारखानेही गाळप सुरु करण्याच्या तयारीत लागले आहेत आणि अनेक कारखान्यांनी गाळप हंगामाचे संचालनही सुरु केले आहे.
मोरना साखर कारखान्याने सोमवारी आपल्या गाळप हंगामाचा शुभारंभ केला. जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांमध्येही गाळप लवकरच सुरु होईल. त्यांनी देखील कारखाना सुरु करण्याची तारीख घोषित केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत पाच साखर कारखाने सुरु होतील.
उत्तर प्रदेशमध्ये ऊस थकबाकी भागवण्याचा मुद्दाही गरम झाला आहे. शेतकर्यांकडून मागणी केली जात आहे की, गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी थकबाकी भागवली जावी. कारखान्यांनी अश्वासन दिले आहे की, लवकरात लवकर थकबाकी भागवण्याचा प्रयत्न केला जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.