रुडकी : ऊस शेतकर्यांसाठी चांगली बातमी आहे. ऊसाच्या मोठ्या उत्पादनामुळे यावेळी जिल्ह्यामध्ये साखर कारखाने गाळप हंगाम लवकर सुरु करणार आहेत. यासाठी साखर कारखान्यांनी आतापासूनच दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.
हरिद्वार जिल्ह्यात 94 हजार हेक्टर कृषी जमीन आहे आणि 1.27 लाख शेतकरी आहेत. यामध्ये जवळपास 77 हजार शेतकरी असे आहेत, जे जिल्ह्यातील ज्वालापूर, लक्सर, लिब्बरहेडी आणि इकबालपूर ऊस समितींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांशिवाय देहरादून जिल्ह्याच्या च्या डोईवाला साखर कारखान्यालाही ऊस पुरवठा करतात. यावेळी जिल्ह्यामध्ये ऊसाचे मोठे उत्पादन झाले आहे.ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांनी सांगितले की, कोणत्याही साखर कारखान्याला उत्तर प्रदेशातून ऊस खरेदी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशामध्ये साखर कारखान्यांनी आतापासूनच गाळप हंगामाची तयारी सुरु केली आहे. इकबालपूर साखर कारखान्यामध्ये बॉयलरच्या पूजनानंतर मेटेनंन्स चे काम सुरु झाले आहे. लिब्बरहेडी साखर कारखान्यामध्येही तयारी सुरु आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे.ऊस विभागाचीही सर्वे शी संलग्न सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सहायक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, लवकरच शेतकरी ऊसाच्या सट्ट्याचे प्रदर्शन करतील. यावेळी सर्वे पूर्णत: पारदर्शी पद्धतीने करण्यात आला आहे. यासाठी जर कोणतीही त्रुटी राहिली असेल तर शेतकर्यांनी ती दुरुस्त करुन घ्यावी. यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.