यंदा दिवाळीनंतर सुरू होणार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम

शामली : यावर्षी दिवाळीनंतर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. साखर कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत तीस टक्के काम वीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पुढील महिन्यात कारखाने आपल्या उसाच्या उताऱ्याची पडताळणी करतील. गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातील तिन्ही कारखान्यांचे गाळप एक नोव्हेंबरनंतर सुरू झाले होते. गेल्यावर्षी सात नोव्हेंबर रोजी थानाभवन कारखाना, आठ नोव्हेंबर रोजी शामली कारखाना तर १३ नोव्हेंबर रोजी ऊन कारखाना सुरू झाला होता.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावर्षी दीपावलीनंतर कारखाना सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी तिन्ही कारखान्यांच्या प्रशासनाकडून सुरू आहे. शामली आणि ऊन कारखान्यात दुरुस्ती सुरू आहे. पुढील महिन्यात उताऱ्याची चाचणी केली जाईल. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा होईल. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन घोषणापत्र सादर केले आहे, त्यांच्या तोडणीचे वेळापत्रक लखनौ ऊस आयुक्तांना पाठवले जाईल. शामली आणि ऊन कारखान्याची गाळप क्षमता प्रत्येकी प्रती दिन ७५ हजार क्विंटल थानाभवन कारखान्याच्यावतीने ९० हजार क्विंटल प्रती दिन ऊस गाळप केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here