लखनौ : ऊस उत्पादनातील उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची कामगिरी, व्यवस्थापन याची चर्चा दूरवर पसरली आहे. त्यामुळे याची माहिती घेण्यासाठी तामिळनाडू राज्यातील पाच सदस्यांच्या शिष्टमंडळाने ऊस विकास विभागाच्या मुख्यालयाला भेट दिली. पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऊस आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. ऊस विकास तथा साखर उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी शिष्टमंडळाला सांगतिले की, आपल्या हितधारकांसाठी ऊस विकास विभाग सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ऊस बिले देणे, ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा अशा विविध घटकांमध्ये ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित करण्यात आला आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अप्पर आयुक्त भुसरेड्डी यांनी ऊस विकास विभागाकडून केला जाणारा सर्व्हे, स्मार्ट ऊस शेतकरी प्रकल्प, पेपरलेस यंत्रणा, ऊसाचे वाण, प्रशिक्षण, प्रचार-प्रसार, तक्रार निवारण पद्धती, एस्क्रो अकाऊंट, खांडसरी, फार्म मशीनरी बँक, महिला सशक्तीकरण आदी विभागातील कामाची माहिती दिली. कोविड १९च्या दरम्यान साखर उद्योगाने कसे निरंतर व्यवस्थापन केले, याची माहिती शिष्टमंळाला दिली. या सदस्यांनी तामीळनाडूत उद्योगासमोर येणाऱ्या अडचणी, संशोधन, ऊसावरील रोग व्यवस्थापन, ड्रिप इरिगेशन, ऊस शेतीतील यंत्रांचा वापर आदी गोष्टींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तामीळनाडू राज्य सहकारी साखर कारखाना एमआरकेकेचे कार्यकारी संचालक/जिल्हा महसूल अधिकारी आर. सधीश, तामिळनाडू शुगर कॉर्पोरेशन लिमिडेट चेन्नईचे मुख्य ऊस विकास अधिकारी ए. ममुंडी, सुब्ररमणीया सिवा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी के. दामोदरन, तिरुत्तनी सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी पी. विलियम अँथनी, कलाकुरिचीप्प सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी ए. एंट्रोन जेवियर अरुल आदी उपस्थित होते.