गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची कारखानदारांची सहकार मंत्र्यांकडे मागणी

पुणे : राज्यातील गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी राज्यातील काही साखर कारखानदारांनी सोमवारी सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे केली. उद्या होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत 1 नोव्हेंबरवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने किमान २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. कर्नाटकमध्येही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु होणार असून आपल्याकडे हंगाम उशिरा सुरु झाल्यास दरम्यानच्या काळात सिमाभागातील कारखान्याकडून महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला बसू शकतो. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करावा, अशी मागणी कारखानदारांनी मंत्री वळसे- पाटील यांच्याकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here