बरेली : ऊस विभाग आता गुजरात च्या भुंगरु प्रणालीप्रमाणे पावसाचे पाणी साठवण्याचे काम करणार आहे. या अंतर्गत कमी पाणी असणार्या क्षेत्रामध्ये ही ऊसाची शेती करणे सोपे होईल. सध्या याचे परीक्षण सुल्तानपूर आणि गाजीपूर मध्ये ऊस आयुक्त यांनी सुरु केला आहे. यानंतर या प्रणालीला सर्व जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओसाड जमीनीवर ही आता ऊस लागवडीचे स्वप्न साकार होईल. गुजरातमध्ये हा पॅटर्न चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. गुजरातच्या या मॉडेलला आता आपल्या प्रदेशामध्येही लागू करण्याची तयारी आहे. ट्रायल पद्धतीने ऊस शोध परिषद शाहजहांपूर चे उपकेंद्र अमहट, गाजीपूर आणि सुल्तानपूर मध्ये पावसाचे पाणी साठवण्यात येत आहे. यामध्ये पाणी संऱक्षण प्रणालीमध्ये पावसामध्ये वाहून जाणार्या पाण्याला रिचार्ज केल जाते. यामुळे ज्या जागेत पाणी थांबू शकत नाही व ऊस पीकू शकत नाही तिथेही सिंचन केले जावू शकते. याच्या वापरामुळे घटणार्या भूजल पातळीला थांबवले जावू शकते. तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जावू शकेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.