ऊस उत्पादकांना बिलापोटी ११४ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण : लोकमंगल कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख

धाराशिव: लोकमंगल शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रिज लिमिटेड या कारखान्याने २०२३-२४ च्या गळीत हंगामात ४ लाख १९ हजार ८६१ टन एवढे उस गाळप केले असून शेतकऱ्यांना ११४ कोटी ३ लाख एवढे ऊसाचे पेमेंट केले आहे. शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम एफआरपी नुसार त्यांना देणे असलेल्या रकमेपेक्षा २५ कोटी ६४ लाख रुपयांनी जास्त म्हणजे २९ टक्के अधिक आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

लोहारा येथील या साखर कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात ४ लाख १९ हजार ८६१ टन एवढे विक्रमी उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना एफआरपी दर २१०५ रुपये प्रति टन असा देय होता पण कारखान्याने सरासरी २७१६ रुपये दर दिला. हा दर एफआरपी पेक्षा टनामागे ६१० रुपयांनी जास्त होता. यातून शेतकऱ्यांना एकूण ८८ कोटी ३९ लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ११४ कोटी ३ लाख रुपये देण्यात आले. ही जादा रक्कम २५ कोटी ६४ लाख रुपयांनी जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियामानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा २९.०१ टक्क्यांनी जास्त आहे, असा दावा देशमुख यांनी केला.

कारखान्याने काहीसे उशिराने ऊस बिल दिलेले आहे, परंतु आता १०० टक्के दिले आहे. आता सरकारने ऊस तोड कामगारांना त्यांच्या मजुरीत ३४ टक्के वाढ मंजुर केली आहे. त्यांचे पेमेंट कारखाना लवकरच अदा करील, असे देशमुख यांनी सांगितले. २०२३-२४ गळीत हंगामातले सगळे पेमेंट पुर्ण करून कारखाना २०२४-२५ च गळीत हंगाम असाच विक्रमी गाळपाच करण्यास सिध्द आहे. गतवर्ष शेतकऱ्यांनी जसे सहकार्य केले तसेच्च याही वर्षी करावे आणि तसे झाल्यास खात्रीने हाही हंगाम आपण यशस्व करून असे ते म्हणाले.

यावेळी कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, पराग पाटील, वरिष् सरव्यवस्थापक छगन भोगाडे, सहा सरव्यवस्थापक व्यंकटेश वाघोलीकन प्रशासकीय अधिकारी राजकुमान सगर, गणेश मोरे, चिफ केमिस्ट नरेश रामपुरे, विद्युत सहाय्यक गणेश मोरे, ऊस पुरवठा अधिकारी पंडित चव्हाण, बिराजदार, केन अर्कोटंट श्री शाम साळुंखे. प्रमुख लिपीक. किरण पाटील इ. उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here