पैठण : तब्बल दोन वर्षांनंतर जायकवाडी धरणाचा पाठीसाठा शंभर टक्के झाला असून, धरणाच्या चार गेटमधून दोन हजार क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला असून, यानंतर पाण्याच्या पातळीची स्थिती पाहून विसर्ग कमी – जास्त केला जाईल, असे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे आणि अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. दि. १५ ऑगस्टला बंधाऱ्यांत पाणी सोडल्यानंतर रविवारी धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले.
जायकवाडी धरणातून सध्याचा विसर्ग :
गेट क्र.10,17,18, 27 या गेटमधून सध्या पाचशे क्युसेक, तर पैठण जलविद्युत केंद्रामधून 1589 क्युसेक विसर्ग नदीपात्रात चालू आहे. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी सकाळपासूनच धरण परिसरात गर्दी केली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.