कुशीनगर : जवळपास ११० दिवस गाळप करीत असलेल्या खड्डा साखर कारखान्याने रविवारी रात्री उशिरा आपल्या गळीत हंगामाचा समारोप केला. कारखान्याने गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ४१ हजार क्विंटल कमी ऊस गाळप केले आहे.
खड्डा साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ११३ दिवस कारखाना चालवून १८ लाख ३१ हजार क्विंटल उसाचे गाळप केले होते. यावर्षी २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेला कारखान्याचा हंगाम ११० दिवस चालला. या काळात १७ लाख ८९ हजार ४९९ क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले. २०२०-२१ च्या तुलनेत हे गाळप ४१ हजार क्विंटलने कमी आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक कुलदिप सिंह, ऊस विभागाचे व्यवस्थापक सविंदर कुमार यांनी सांगितले की, कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊस बिले दिली आहेत. चालू हंगामात एकूण ऊस बिल ६२ कोटी ५४ लाख ७६ हजार ४९१ रुपयांपैकी कारखान्याने ४९ कोटी ४१ लाख ४० हजार ८४४ रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहेत.