दि इथेनॉल व बायोफ्युअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्याध्यक्ष पदी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्षपदी प्रतिक पाटील व विकास रासकर यांची एकमताने निवड

सोलापूर : दि इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची सन 2023-2024 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि .6 ऑक्टोबर 2024 रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर- अकलूज (जि. सोलापूर) येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषयांचे वाचन झाल्यानंतर सभासदांच्या मधून श्री. प्रशांत वाघ, खंडोबा डिस्टीलरीज् प्रा.लि.. यांनी असोसिएशनच्या नावात बदल करुन दि इथेनॉल व बायोफ्युअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया असे करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय पत्रिकेवरील विषय क्र.४ अन्वये नुतन संचालक मंडळाची निवड करण्यात आली. नुतन संचालक मंडळातून इथेनॉल असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील तसेच उपाध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील व विकास रामचंद्र रासकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे सचिव आर. जी. माने यांना पदोन्नती देवून संस्थेच्या एक्झुकेटिव्ह संचालक पदी निवड करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील व कै. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे प्रतिमेचे पूजन राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे (सांगली) अध्यक्ष प्रतिक पाटील आणि रिगोला बायो केमिकल्स प्रा. लि., पुणेचे अध्यक्ष विकास रासकर यांच्या हस्ते करण्यात आले. नुतन संचालक मंडळाची खालील प्रमाणे निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

1) विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री)

2) हर्षवर्धन शहाजीराव पाटील (माजी सहकार मंत्री)

3) जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर (माजी सहकार राज्यमंत्री)

4) बी. बी. ठोंबरे (अध्यक्ष, विस्मा)

5) आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील

6) प्रतिक जयंत पाटील

7) विवेक बिपीनदादा कोल्हे

8) विकास रामचंद्र रासकर

9) शरद अरुण लाड

10) संग्रामसिंह एस. देशमुख

11) प्रवीण लक्ष्मणराव मोरे

12) स्वरूप दिलीपराव देशमुख

13) रणजित पद्माकर मुळे

14) संजीव आर. देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here