सहारनपूर : गाळप हंगाम संपून साडेतीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील दोन साखर कारखाने शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. मात्र गंगनौली आणि गागलखेडी या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. हे दोन कारखाने कधी ऊस बील देणार ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. सध्या गंगनौली कारखाना १९१ कोटी ८६ लाख रुपये आणि गागलखेडी कारखाना ४८ कोटी २६ लाखांहून अधिक ऊस बील देणे बाकी आहे.
जिल्ह्यातील देवबंद, सरसावा, नानौटा, शेरमाळ आणि तोडरपूर या पाच साखर कारखान्यांनी मात्र शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. गेल्यावर्षी गंगनौली साखर कारखान्याने ऊस बिल देण्यास उशीर केल्याने राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्याचे गोदाम व प्रशासकीय इमारत सील केली होती. गागलखेडी कारखान्यानेही बिले उशिरा दिली होती. यंदाही दोन्ही कारखाने ऊस बील वेळेत देण्यात अपयशी ठरले आहेत.