बागपत: शेतकऱ्यांना ऊस बिले न दिल्याने ऊस विभागाने मलकपूर साखर कारखान्यावर कडक कारवाईस सुरूवात केली आहे. गेल्या हंगामातील ऊस बिले थकल्याने कारखान्याच्या साखर विक्रीवर निर्बंध घातल्याचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर कारखाना प्रशासनाने गेल्यावर्षाची संपूर्ण साखर विक्री केली. मात्र, शेतकऱ्यांचे सुमारे १५८ कोटी रुपये थकीत आहेत. कारखाना प्रशासन जोपर्यंत हे पैसे देणार नाही, तोपर्यंत त्यांना साखर विक्रीची परवानगी देण्यात येणार नाही.
ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामांवर नजर ठेवली आहे. सध्याच्या गळीत हंगामातही मलकपूर कारखान्याकडे १५७.२७ कोटी रुपये देणे आहे.
चालू गळीत हंगाात मलकपूर कारखान्याने आजअखेर ४८.९२ क्विंटल उसाचे गाळप केले आहे. तर ५.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की साखर कारखान्याला थकीत ऊस बिलाबाबत कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.