कैथल : सहकारी साखर कारखाना प्रशासनाने २०२१-२२ या कालावधीत खरेदी केलेल्या सर्व ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहेत. कारखान्याने ३८.९४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. त्यापोटी १४,०६९.४५ लाख रुपये कारखान्याने देऊन राज्यातील सर्व कारखान्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्याने १२ नोव्हेंबर २०२१ पासून एक मे २०२२ पर्यंत १७० दिवसांत ३८.९४ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन ८.८५ टक्के सरासरी उतारा मिळवला होता. कारखान्याने तीन लाख ४५ हजार ८७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक वीरेंद्र चौधरी यांनी या यशाबद्दल कारखान्याचे व्यवस्थापन, कर्मचारी, अधिकारी, शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, २०२२-२३ साठीचा ऊस सर्व्हे पूर्ण झाला आहे. यावर्षी १७,२६८.७५ एकरात ऊस आहे. यामध्ये ११,६३३.५ एकर खोडवा तर ५,६३५ एकर नवी लागण आहे. यामध्ये पूर्वहंगामी व लागण उसाचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऊस क्षेत्र १८,५९३ एकर होते. कारखान्याने जीपीएस प्रणालीने उसाचे सर्वेक्षण केले आहे. जिल्हाधइकारी कॅथल यांचेही कारखाना प्रशासनाने आभार व्यक्त केले आहेत.