बागपत : थकीत ऊस बिलप्रश्नी चौगामा विभागातील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने रमाला कारखान्याचे सरव्यवस्थापकांची भेट घेतली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चौगामा विभागातील दोघट, मौजिजाबाद, नांगल, दाहा, निरपुडा, भडल, गैडबरा, आदमपूर, इदरीशपूर, टिकरी, चित्तमखेडी आदी गावातील शेतकऱ्यांचा ऊस भैसाना कारखाना खरेदी करतो. कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरचीच ऊस बिले दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. बुधवारी विभागाचे हरेंद्र पवार, कुलदीप पवार, वायरन पवार, कृष्णपाल, राजेंद्र सिंह, सुभाष सिंह, देवेंद्र आदी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रमाला कारखान्याचे सरव्यवस्थापक शादाब अस्लम यांची भेट घेतली. लवकरात लवकर कारखान्याने पैसे द्यावेत. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. याबाबत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पैसे दिले जातील असे सरव्यवस्थापकांनी सांगितले.