बरेली : खमरिया येथील जंगलात लागलेल्या आगीत ४६ एकरातील ऊस पिक जळून खाक झाले. शेजारील गावांतील काही तरुणांनी जंगलात झाडावरील मधमांशांच्या पोळ्यातून मध काढण्यासाठी आग लावली होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. पोळे काढल्यानंतर जळती लाकडे तेथेच सोडून ते तरुण निघून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ही आग पसरत शेतापर्यंत पोहोचली. खमरिया येथील प्रमोद सारस्वत यांनी सांगितले की, आगीत वेदप्रकाश गंगवार यांचा १८ एकर ऊस, राजेंद्र सिंह यांचा पाच एकर, राम मोहन यांचा तिन एकर, ग्रंथपाल यांचा दोन एकर, लालता प्रसाद यांचा चार एकर, दिल्लीधर यांचा पाच एकर, डोरीलाल यांचा दोन एकर आणि रामभरोसे लाल यांचा चार एकरातील ऊस जळू खाक झाला.