‘कृष्णा’चा पहिला हप्ता प्रति मेट्रिक टन ३२०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा: अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले

सातारा : कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२४- २५ मधील ३० नोव्हेंबरअखेर या कालावधीपर्यंत गळीत केलेल्या उसाला प्रतिमेट्रिक टन ३२०० रुपयेप्रमाणे पहिला हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. ते म्हणाले, कृष्णा कारखान्यात पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. सहवीज सहवीज निर्मिती प्रकल्प देखोल कार्यान्वित आहे. या गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२४ अखेर ४ लाख २६ हजार ६०० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, ४ लाख ४८ हजार ४४० क्विंटल साखर पात्यांचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसाला पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे अदा केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखाना व आसवनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, केंद्र शासनाच्या धोरणास प्रतिसाद म्हणून इथेनॉलचेही उत्पादन घेण्यात येत आहे. कारखान्याच्या या हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. कारखान्याच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी सभासद व ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक मंडळ, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके व अधिकारी उपस्थित होते.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here