पुणे : सोमेश्वर कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे पंधरवडा पेमेंट तत्काळ सभासदांच्या खात्यावर व्याजासह वर्ग करावे, अन्यथा 11 डिसेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे. कारखान्याने 35 दिवसांमध्ये जवळपास 2 लाख 80 हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातील गेटकेन उसाचे 90 हजार टन गाळप केले असून, सभासदांच्या उसाचे 1 लाख 90 हजार टन गाळप केले आहे.
काकडे म्हणाले कि, कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही. गाळप झालेल्या उसाचे पेमेंट सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले नाही. ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत एफआरपी रक्कम देणे कायद्याने बंधनकारक असून, कारखान्याने अद्यापपर्यंत ऊसबिल दिलेले नसल्याने होणाऱ्या व्याजाची रक्कम ही कारखान्याने द्यावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.डिसेंबरपर्यंत कारखान्याने सभासदांच्या गाळप झालेल्या उसा पंधरवठा पेमेंट सभासदांच्या बँक खात्यात व्याजासह वर्ग करावे, अन्यथा सोमवारपासून शेतकरी कृती समितीस कारखाना कार्यस्थळावर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला, गेटकेन उसाची ऊसतोड ताबडतोब थांबवावी, अशी मागणीही सतीश काकडे यांनी केली आहे.