ऊस शेतकर्‍यांचे भवितव्य उज्ज्वल असेल: योगी आदित्यनाथ

लखनऊ : ऊस गाळप हंगाम 2019-2020 आता अगदी जवळ येवून ठेपला आहे. पण उत्तर प्रदेशातल ऊस शेतकर्‍यांना अजूनही थकबाकी मिळालेली नसल्याचा आरोप आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे की, राज्यात एकूण ऊस थकबाकी 5,000 करोड रुपये आहे. सरकारने ऊस शेतकर्‍यांना 74,000 करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे भागवले आहेत. ते म्हणाले, या देशातील ऊस शेतकर्‍यांचे भवितव्य उज्ज्वल आहे, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऊसापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली आहे आणि त्याचबरोबर राज्यात उद्योगही येत आहेत.

अलीकडेच, योगी सरकारने साखर कारखान्यांना 31 ऑक्टोबर पूर्वी शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले आहेत. जे कारखाने थकबाकी भागवणार नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सरकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. शेतकर्‍यांची देणी देय असल्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनाद्वारे तिव्र संताप व्यक्त केला आहे.

यापूर्वी, ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले होते की, शेतकर्‍यांची राहिलेली थकबाकी ऑक्टोबर पूर्वी भागवली जातील. आणि जर कारखाने ही बाकी भागवण्यात अपयशी ठरले तर, त्यांना रिकव्हरी प्रमाणपत्र जारी केले जातील आणि त्यांच्या गोदामातील अतिरिक्त साखर विकून त्याद्वारे शेतकर्‍यांचे पैसे भागवले जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here