सरकारने वैरण जाळण्यावरील नियम कडक केल्याने थायलंड मधील उस गाळपात घट

सिंगापूर :
थायलंडमध्ये ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या गाळप हंगामाची सुरुवात खूपच मंद गतीने सुरु झाली आहे. पर्यावरण शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने सरकारने वैरण जाळण्यावरील नियम कडक केले असल्याने उस गाळपात घट झालेली दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाजार सूत्रांनी सांगितले की, 2020/2021 च्या गाळप हंगामासाठी सरकारने 80 टक्के स्वच्छ आणि ताजा उस गाळप करण्याबाबत सांगितले आहे. ताजा उस खेरदी केला असेल तर सरकार अनुदान देईल. उस तोडणीसाठी शेतकर्‍यांचा उस तोडणी मजुरांपेक्षा हार्वेस्टर मशिनवर अधिक विश्‍वास आहे.

मध्य आणि उत्तर थायलंड मध्ये 10 कारखान्यांनीे अजूनही गाळप सुरु केले नाही. तथापि, या कारखान्यातील गाळप जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असे सूत्रांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी जर नियम पाळले नाहीत तर सरकारकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्लॅटस यांनी दिलेल्या गाळप अहवालानुसार, थाई साखर कारखान्यांनी खरेदी केलेल्या एकूण उसापैकी 80.4 टक्के उस ताजा होता. तसेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत 19.6 टक्के किंवा 1.99 मिलियन टन उस जाळण्यात आला.

थाई उस गाळप हंगाम डिसेंबरच्या मध्यात सुरु होतो आणि मे मध्ये संपतो. पण यंदा कोरड्या हवामानामुळे आणि उसाच्या कमीमुळे हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरु होणार आहे.

थाई निर्मिती सूत्रांनी सांगितले की, ही चांगली गोंष्ट आहे की जळालेला उस 20 टक्क्यांपर्यंत कंट्रोल करण्यात आला. जाळलेल्या उसाचे प्रमाण कमी ठेवल्यास साखरेचा खप वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here