चंदीगढ, हरियाणा: इनैलो चे प्रधान महासचिव तसेच आमदार अभयसिंह चौटाला यांनी सांगतिले की, महाआघाडी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकर्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे.
इनैलो नेत्यांनी सांगितले की, हरियाणातील ऊस उत्पादकांना त्यांच्या पीकाला योग्य दर मिळावा यासाठी प्रदेशामध्ये शुगरकेन कंट्रोल बोर्ड स्थापन करण्यात आला आहे, ज्याचे चेअरमन राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा बोर्ड प्रत्येक वर्षी बैठक घेवून ऊसाचा दर निश्चित करतो. यावर्षी आतापर्यंत ऊस दर निश्चित झालेला नाही. गेल्या वर्षी (2019-2020)मध्ये ही राज्य सरकारने ऊस शेतकर्यांकडे दुर्लक्ष करुन ऊस दर वाढवला नव्हता. त्यांनी सांगितले की, आमची मागणी आहे की, सरकारने ताबडतोब ऊसाला प्रति क्विंटल 400 रुपये दर घोषित करावा. जेणेकरुन ऊस शेतकर्यांना त्यांच्या पिकाचे योग्य पैसे मिळू शकतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.