राज्य सरकार सहकारी साखर कारखान्यांना थकबाकी भागवण्यासाठी लवकरच मदत करेल : मुख्यमंत्री
चंदीगड(पंजाब) : काही दिवसापासून पंजाब मध्ये ऊस थकबाकीवरुन बराच वाद सुरु आहे. कांग्रेस चे राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी मंगळवारी पंजाबच्या आपल्या पक्षाच्या तीन आमदारांसह राज्यातील ऊस शेतकऱयांना पैसे देण्यात झालेल्या विलंबाचा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगितले होते.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, मुख्यमंत्र्यांनी ऊस थकबाकीबाबत आश्वासन दिले की, राज्य सरकार सहकारी साखर कारखान्यांना थकबाकी भागवण्यासाठी लवकरच पैसे देईल आणि खाजगी कारखानदारांवर पैसे भागवण्यासाठी दबाव टाकेल.
साखर कारखाने कोरोना मुळे आर्थिक संकटात आहेत. कारण त्यांची विक्री ठप्प झाल्याने त्यांना उत्पनाच्या च्या समस्येचा सामना करावा लागत आहे.