साखरेचा हमीभाव 3400 रुपये करावा

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी

कोल्हापूर, दि. 20 सप्टेंबर 2018: देशात प्रति क्विंटल साखरेचा हमीभाव  2900 वरून 3400 करावा, अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संस्थापक व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले  यावर्षी  साखरेचे उत्पादन वाढले आहे. साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. त्याला दिलासा देण्यासाठी ५० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीची गरज आहे. त्यासाठी शासनाने प्रति क्विंटल ५५ रुपयांचे अनुदान हे १५० रुपये करावे लागणार आहे. तसेच साखरेचा हमीभाव 2900 रुपयांवरून 3400 रुपये करवा लागणार आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे. अशी मागणी माजीसहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here