सहारनपूरमध्ये दोन साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

सहारनपूर : शेरमऊ येथील उत्तम शुगर मिल आणि सरसावा येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी विधिवत गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला. उत्तम साखर कारखान्यात खासदार प्रदीप चौधरी, उपाध्यक्ष सुखजिंद्र सिंह आणि सरसवामध्ये आमदार मुकेश चौधरी, व्यवस्थापकीय संचालक दिप्ती देव यादव यांनी गव्हाणी मोळी टाकून गळीत हंगामास प्रारंभ केला.

अमर उजालामध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, उत्तम शुगर मिलमध्ये खासदार प्रदीप चौधरी, कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी बैलगाडीतून पहिल्यांदा ऊस आणणारे सलारपूरा येथील शेतकरी धनसिंह आणि ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस आणणारे शेतकरी काबज व धीरसिंह यांचा हार घालून सत्कार केला. त्यांना भेटवस्तू देण्यात आली. पंडित मनोज शर्मा यांनी यज्ञ केला. यावेळी विभाग प्रमुख दिनेश चौधरी, जिल्हा पंचायत सदस्य सुशील कम्हेडा, पवन सिंह राठौर, जितेंद्र जागलान, संजय प्रधान, रुपेंद्र चौधरी, जगपाल सिंह, महिपाल सिंह, प्रधान चंद्रपाल, संजय कम्हेडा, रामपाल, अरविंद, बाबूराम आदी उपस्थित होते. सरसावा येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यात पहिल्यांदा ऊस आणणारे शेतकरी देवी दयाल आणि शमशुद्दीन यांचा आमदार मुकेश चौधरी यांच्यासह अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य लेखापाल सौरभ बन्सल, कामगार नेते राजवीर कुमार, रामाशीष यादव, राजेंद्र सैनी, संजय राठी आदी उपस्थित होते. सरसावा येथे शेतकऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक दिप्ती देव यादव यांच्याकडे थकीत बिलाविषयी विचारणा केली. लवकरच बिले दिली जातील असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here