उन्हाचा तडाखा वाढला, आयएमडीचा या विभागासाठी पावसाचा इशारा

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दिवसभर तापमान वाढल्याने लोकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. उत्तर भारतातील काही डोंगराळ भागात बर्फवृ्ष्टीही झाली. त्यामुळे तापमान घसरले आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्यामुळे वातावरण बदलले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी आयएमडीने सांगितले आहे की, केरळ, तामिळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल, कर्नाटकात पुढील पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. याशिवाय दक्षिण द्विपकल्पात हवेतील बदलामुळे २६ मार्च रोजी आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसिमाच्या किनारपट्टीवरील भागात पावसाची शक्यता आहे.

याशिवाय, २६ मार्च रोजी बंगालच्या खाडीकडील पूर्वोत्तर राज्यांत जोरदार वाऱ्यामुळे अरुणाचल प्रदेश, आसम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये जोरदार पाऊस दिसू शकतो. आयएमडीने सांगितले की, पुढील २४ तासात उत्तर भारतातील बहुतांश भागात तापमानात महत्त्वाचा बदल होणार नाही. त्यानंतर यामध्ये २-४ डिग्री सेल्सिअसची वाढ होऊ शकते. पुढील तीन दिवस गुजरातमथध्ये तापमान २-३ डिग्री सेल्सिअसने वाढेल. महाराष्ट्रात पुढील ४८ तासात तापमानात बदलाची शक्यता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here