देशात ११० दिवसांनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, दिवसात ४० हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ४० हजार रुग्ण दिवसभरात आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३९ हजार ७२६ रुग्ण आढळल्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,१५,१४,३३१ झाली आहे. दरम्यान कोरोनाने १५४ नव्या रुग्णांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत एकूण १,५९,३७० जणांचा मृ्त्यू झाला आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सक्रिय रुग्णसंख्या २,७१,२८२ रुग्ण असून १,१०,८३,६७९ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आयसीएमआयने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात एकूण २३,१३,७०,५४६ सॅम्पल घेण्यात आले. त्यापैकी १०,५७,३८३ टेस्ट काल एका दिवसात करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिनीनुसार गेल्या २४ तासात या वर्षातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सलग नवव्या दिवशी कोरोना संक्रमण वाढले आहे. नव्या संक्रमित रुग्णांची संख्या २.३६ टक्के आहे. यापूर्वी गेल्यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी ४१ हजार ८१० रुग्ण आढळले होते. गेल्यावर्षी ७ ऑगस्ट २०१९ रोजी कोरोना संक्रमितांची संख्या २० लाख झाली होती. तर २३ ऑगस्ट रोजी ३० लाख रुग्ण झाले होते. १९ डिसेंबरला एकूण रुग्णसंख्या एक कोटींवर पोहोचली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here