वॉशिंग्टन: कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या आर्थिक व्यवस्थेंवर परिणाम झाला आहे. भारतामध्ये देखील याचा मोठा परिणाम झाला आहे, पण जाणकारांच्या मतानुसार, योग्य धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटातून बाहेर येईल.
आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाच्या एका अधिकार्याने सांगितले की, या संकटातून बाहेर येण्यासाठी केंद्र सरकार च्या वित्तीय आणि मौद्रिक दोन्ही पक्षांच्या प्रयत्नांचेही आयएमएफ ने कौतुक केले आहे. आयएमएफ ने सांगितले की, केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था योग्य धोरणांसह कोरोना वायरस संकटातून वर येईल.
आयएमएफ ने आपल्या वार्षिक जागतिक आर्थिक आउटलुक 2020 मध्ये भारताची जीडीपी घटून मायनस 10.3 टक्के केली आहे. पण आयएमएफ ने हेदेखील सांगितले की, भारत 2021 मध्ये 8.8 टक्क्याच्या विकास दरासह जोरदार परती करण्याची शक्यता आहे, पण यासाठी भारताला विविध क्षेत्रामध्ये आपल्या प्रयत्नांना वाढवण्याची गरज आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.