केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने २४ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सप्टेंबर २०२१ या महिन्यासाठी देशातील ५५८साखर कारखान्यांना देशांतर्गत विक्रीसाठी २.५ लाख टन अतिरिक्त साखरेचा साठा मंजूर केला आहे.
डीएफपीडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२१ मध्ये साखरेची मागणी लक्षात घेऊन आणि देशांतर्गत खपासाठी साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यासाठी कारखाना निहाय साखरेचा सप्टेंबर २०२१ साठी २.५ लाख टनाचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला आहे.
महिन्याच्या अखेरीस अतिरिक्त साखर कोटा मंजूर केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत गोंधळाची स्थिती आहे. साखरेच्या किमतीमध्ये सात महिन्यानंतर वाढ दिसून आली होती. आता या किमती घसरतील अशी शक्यता आहे.
चीनीमंडी न्यूजशी बोलताना, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे (एनएफसीएसएफ) कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पाच दिवसांत २.५ लाख टनाचा अतिरिक्त साखर कोटा विक्री केल्याने निश्चितच देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किमतीवर दबाव निर्माण होणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यासाठी सरासरी २२ लाख टन साखरेचे वितरण केले गेले आहे. आता सप्टेंबर २०२१ साठी २४.५ लाख टन सध्याचा कोटा करण्यात आला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट २०२१ पासून देशांतर्गत बाजारातील साखरेच्या किमती वाढू लागल्या होत्या. बाजारातील ट्रेंडही खूप सकारात्मक होता आणि चांगली मागणी मिळत असल्याचे दिसून आले होते. कारखानदार नेहमीपेक्षा आधीच विक्री बंद करीत असल्याचे दिसून येत होते. साखरेचा दरही सरासरी ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटल अधिक होता. भारत सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) ३१०० रुपये प्रती क्विंटल केल्यानंतर पहिल्यांदाच सरासरी दर ३५०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link