मुंबई : इथेनॉल उत्पादनाबाबत, साखर उद्योगामध्ये विशेष उत्साह आहे. अलिकडेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने स्पष्ट केले आहे की, देशात इथेनॉल उत्पादनाची एकूण क्षमता ९१० कोटी लिटरपेक्षा अधिक झाली आहे.
ET Now ला दिलेल्या एका मुलाखतीत, ‘ISMA’ चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सांगितले की, उद्योगाला मुदतीपूर्वीच २० टक्के इथेनॉल मिश्राणाचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास आहे. असोसिएशनने सरकारकडे फ्लेक्सी-फ्यूएल वाहने लाँच करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या क्षेत्रात आणखी खूप काही करण्याची गरज आहे. १०० लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलसाठी डायव्हर्ट करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. इथेनॉल उत्पादनामुळे अनेक कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये इथेनॉल प्लांट्स स्थापन करण्यात येत आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण आता यशस्वी होताना दिसू लागले आहे. कारण, देश आणि जगातील अनेक कंपन्या भारतात इथेनॉल प्लांट स्थापन करण्यात रुची दाखवत आहेत.