केनिया आणि युगांडादरम्यान साखरेच्या मुद्यावर पुढील महिन्यात होणार चर्चा

नैरोबी/कंपाला : केनिया आणि युगांडा यादरम्यान गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला व्यापार तणाव कमी करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये बैठक होणार आहे. केनियातील अधिकारी पुढील महिन्यात युगांडाचा दौरा करतील. शेजारील देशांतून साखर आणि दूध आयात केला जात असल्याचे आरोप युगांडाने आधीच खोटे असल्याचे म्हटले आहे. केनिया आणि युगांडामध्ये गेल्या वर्षभरापासून साखर, दूध आणि पोल्ट्रीसह इतर उत्पादकांच्या निर्यातीबाबत गंभीर तणाव निर्माण झाला आहे.

पशूधन विभागाचे मुख्य सचिव हॅरी किमताई यांनी सांगितले की, युगांडामध्ये कोरोना महामारीची तिसरी लाट नोव्हेंबरमध्ये येईल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही युगांडासोबत काही पत्रव्यवहार करीत आहोत. काही तथ्ये उलगडण्यासाठी एक शोधमोहीम राबविण्यासाठी तेथे जात आहोत असे केनियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. युगांडाने गेल्या आठवड्यात तणाव कमी करण्यासाठी केनियातील कृषी आणि व्यापार मंत्र्यांच्या स्तरावरील पथकांना कंपाला येथे चर्चेला बोलावले होते. केनियात युगांडाचे उच्चायुक्त हसन वास्वा गॅली बांगो यांनी केनियाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला निमंत्रण दिले होते.

गेल्या महिन्यात युगांडाने केनियाला आपल्या ठरलेल्या साखर निर्यात कोट्यापैकी ७९ टक्के कपातीला विरोध केला होता. साखर महासंचालनालयाने सांगितले की व्यापाऱ्यांना युगांडाकडून फक्त १८,९२३ टन साखर आयात करण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी केनियाने ९०,००० टन आयातीला मंजुरी दिली होती. दोन्ही देशांमधील करारानुसार युगांडाला तीन वर्षापूर्वी अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरी दिली होती. मात्र, केनियाने गेल्यावर्षीच्या अखेरीस त्याच्या अंमलबजावणीस उशीर केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here