तेहरान: ईराणच्या हफ्त तपेह साखर कारखाना कर्मचार्यांनी सांगितले की, थकीत मजूरी आणि कारखान्याला पुन्हा सार्वजनिग करण्याच्या मागणीबाबत गेल्या 45 दिवसांपासून संप सुरु आहे. दक्षिण पश्चिमी ईराण च्या शुश मध्ये हफ्त तपेह साखर कारखान्याच्या मजुरांना जवळपास तीन महिने मजुरीशिवाय 12 जून ला बाहेरचा रस्ता दाखवणयात आला. ऊस मजुरांनी बुधवारी सरकारकडे राजनाम्याच्या मागणीसाठी भीषण उन्हाळ्यात मोर्चा काढला. शेकडो कामगार सराकारविरोधात घोषणा देत रस्त्यावर उतरले. कामगार सुधारीत नियम आणि अटींसाठी दबाव टाकत आहेत.
दक्षिण पश्चिमी ईराणच्या शुशमध्ये हफ्त तफेह साखर कारखान्यातील कामगारांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. हफ्त तपेह साखर कारखाना 1961 मध्ये स्थापन करण्यात आला होता. 2016 मध्ये एक वादग्रस्त करारामध्ये कारखान्याचे खाजगीकरण करण्यात आले.
कर्मचार्यांनी सरकारकडून राजीनाम्याची मागणी केली आणि 50 डिग्रीच्या तापमानातही सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. साखर कारखाना कर्मचार्यांचा मुद्दा आता देशामध्ये गंभीर बनला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.