सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणुकीने नेली जातेय उसाची शेवटची खेप

बीड : राज्यातील काही कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे, तर काही कारखान्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे अनेक गावात ऊस तोडणी मजुरांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून आनंद व्यक्त करत आहेत. सोळंके साखर कारखान्याचा गळीत हंगाम शनिवारी संपला. त्यामुळे उसाच्या ट्रॅक्टरची शेवटची खेप होती. शनिवारी कारखान्याला गेलेली शेवटची ऊस ट्रॉली मजुरांनी रंगीबिरंगी रिबिन, झिरमिळ्या, फुलांचे हार व उसाचे वाढे लावून ट्रॅक्टर सजवली.

सोळंके साखर कारखान्यावर हे ऊस तोडणी मजूर कामाच्या निमित्ताने गेल्या ६ महिन्यांपासून होते. पोटाची खळगी भरण्यासाठी ते दिवसरात्र उसाच्या फडात राबत होते. घराबाहेर असलेल्या उसतोड मजुरांना घरी जायची ओढ लागली आहे. त्यामुळे हा सजवलेला ट्रॅक्टर फडातून बाहेर काढल्यानंतर मजुरांनी हलगीच्या आवाजात गुलालाची उधळण केली. उसाची शेवटची खेप गेल्यानंतर घरी परतण्यास मिळणार असल्याने मजुरांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here