रुडकी: लक्सर साखर कारखान्यानंतर लिब्बरहेडी सागर कारखान्यानेही गेल्या गाळप हंगामाची पूर्ण थकबाकी चुकवण्याची तयारी केली आहे. कारखान्याकडून थकबाकी भागवण्याची अॅडवाइज तयार करण्यात आली आहे. या आठवड्यात शेतकर्यांना थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. इकबालपूरवर सध्या 17 करोड रुपयांचे देय आहे.
कारखाने चालू होवून जवळपास एक महिना होईल. कारखान्यांनी आश्वासन दिले होते की, गाळप हंगाम सुरु झाल्यावर थकबाकी भागवली जाईल. याबाबत गेल्या आठवड्यात उस आयुक्त ललित मोहन रयाल यांनी नाराजी व्यक्त करुन निर्देश दिले होते की, जर एका आठवड्यामध्ये ऊसाचे पैसे दिले नाहीत तर साखर कारखान्यांची आरसी कापली जाण्याची प्रक्रिया सुरु करावी. यावर लक्सर कारखान्याने गेल्या गाळप हंगामाचे 32 करोड 56 लाख रुपयांची थकबाकी भागवली आहे. आता साखर कारखान्यावर गेल्या गाळप हंगामाचे कोणतेही देय नाही. तर लिब्बरहेडी साखर कारखान्यावर 23 करोड रुपये देय आहे. याबाबत साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून थकबाकी भागवण्यासाठी पैशाची व्यवस्था केली जात आहे. या आठवड्यात शेतकर्यांच्या ऊसाचे पैसे दिले जातील. तर इकबालपूर साखर कारखान्याकडून आतापर्यंत थकबाकी भागवण्याबाबत कोणतेही पाउल उचलेले नाही. साखर कारखान्यावर शेतकर्यांचे गाळप हंगाम 2019-20 चे 17 करोड रुपये देय आहे. इकबालपूर उस समितीचे सचिव कुलदीप तोमर यांनी सांगितले की, या संबंधामध्ये विभागाच्या स्तरावर कारवाई केली जात आहे. साखर कारखान्याला नोटीस देण्यात आली आहे.