एमडी नी साखर कारखान्याचा दौरा करुन मशीन्सची केली पाहणी

गोहाना, हरियाणा: गाव अहुलाना येथील चौ. देवीलाल सहकारी साखर कारखाना नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात चालू करण्याची तयारी सुरु आहे. कारखाना ब्रेकडाउन शिवाय चालवण्यावर कारखाना अधिकार्‍यांचा फोकस आहे. यासाठी मशीन्सची तपासणी केली जात आहे. शनिवारी मशीन्स बारकाईने तपासण्यासाठी एमडी आशीष वशिष्ट पोचले.

त्यांनी सांगितले की, कारखाना शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी बनवण्यात आला आहे. कारखाना ब्रेकडाउन शिवाय चालवण्याला प्राधान्य दिले जाईल. मशीन्समध्ये उपयोगी होणारे छोटे स्पेंअर पार्टस अ‍ॅडव्हान्स मध्ये दिले जात आहेत. सर्व इंजिनिअर व अन्य कर्मचारी ईमानदारीने काम करत आहेत. त्यांनी ऊस घालणारी चेन, ऊस गाळप रोलर, बॉयलर व इतर मशीनची तपासणी केली. त्यांनी जास्तीत जास्त कारखान्याची ट्रायल करण्यावर जोर दिला. सरकारकडून कारखाना चालवण्याची तारीख मिळाल्यावर लगेचच कारखाना चालवला जाईल. यावेळी मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र शर्मा, चीफ इंजिनिअर देवेंद्र पहल, डिप्टी चीफ इंजिनिअर अनिल चौहान, टर्बाइन इंजीनिअर एमएस पोखरिया, साखर सेल व्यवस्थापक धनीराम शर्मा, टेक्नीशियन स्टाफ हरपाल पूनिया आणि सतबीर सिंह उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here