निवृत्तीनगर : साखरेचा उत्पादन खर्च 3400 ते 3500 च्या आसपास आहे. तर बाजारात साखरेचा भाव 3100 प्रति क्विंटल इतका आहे. शासनाने साखरेची किमान विक्री किंमत 3 हजार 600 रुपये प्रती क्विंटल करावी अशी मागणी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली. निवृत्तीनगर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 34 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभावेळी ते बोलत होते. हा समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भगवंत घोलप तसेच त्यांच्या पत्नी पुष्पाताई अशोक घोलप यांच्या हस्ते पार पडला.
शेरकर म्हणाले, ऊस उत्पादकांच्या दृष्टीने अडचणीची बाब म्हणजे खोडवा व लागणीच्या उसाला हुमणी किडीचा प्रादुर्भाव होत होता. त्यासाठी विघ्नहर कारखाना ऊस विकास विभागामार्फत योग्य मार्गदर्शन करीत आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून भुंगेरे गोळा करण्यासाठी मोहिम राबविली. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. ते पुढे म्हणाले, 34 व्या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंत्री समितीच्या बैठकीनंतर गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित होणार आहे.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा सुमारे 8 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन भगवंत घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी केले. सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले. तर देवेंद्र खिलारी यांनी आभार मानले. याप्रसंगी सुमित्राताई शेरकर, जयहिंद’चे तात्यासाहेब गुंजाळ, नंदूकाका शेरकर, गणपत शेटे, पांडुरंग गाडगे, रवींद्र माळी, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, अजित परदेशी, हाजरा इनामदार, अर्चना भुजबळ, तानाजी बेनके, संभाजी पोखरकर, वल्लभ शेळके, जानकू डावखर, रामदास बोर्हाडे, गजानन हाडवळे, विजय भोर, विवेक काकडे, रामदास महाबरे आदी उपस्थित होते.
विघ्नहर कारखान्यास यावर्षीही नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्याकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दलचा देशातील पहिल्या क्रमांकाचा सलग तिसर्यांदा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल कारखान्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.