कोल्हापूर, ता. 9 : ज्या प्रमाणे उसाच्या एफआरपीचा दर ठरवला जातो. त्याप्रमाणे साखरेचा किमान विक्री दर ही ठरला पाहिजे. यावर्षी साखरेचा प्रतिक्विंटल किमान विक्री दर 2900 रुपये होता. मात्र, हाच दर 3600 रुपये केल्यास शेतकरी आणि कारखानदारांचा फायदा होणार आहे. केवळ काही ग्राहकांसाठी सरसकट कमी दराने साखर विक्री करून साखर उद्योग तोट्यात येत असल्याची भावना साखर कारखान्यांमधून व्यक्त होत आहे. पुणे येथे झालेल्या साखर परिषद 20-20 मध्येही याचा ऊहापोह झाला. त्यानंतर राज्यातील सर्व साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांना हा मुद्दा उचलून धरण्यास सुरूवात केली आहे.
उसाला एफआरपी देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे उसाचा दर स्थिर राहतो. याउलट साखरेच्या दरात नेहमी चढउतार होत असते. कधी-कधी एफआरपी जास्त आणि साखरेचे दर कमी अशी परिस्थिती असल्यामुळे पक्क्या मालाचा दरापेक्षा कच्च्या मालाच दरच जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे पुणे येथे झालेल्या साखर परिषदेमध्ये साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, साखर कारखानदार तसेच शेतकऱ्यांच्यावतीेने साखरेचा प्रतिक्विंटलचा किमान विक्री दर 3600 रुपये करावा. यामुळे, शेतकऱ्यांना ठरलेल्या म्हणजे चौदा दिवसात एफआरपी देता येईल. कारखान्यांवरही आर्थिक बोजा येणार नाही. त्यामुळे भविष्यातील ऊस गळीत हंगामातील साखरेचा किमान दर आतापासूनच निश्चित केला पाहिजे. अशीही मागणी यावेळी कारखानदारांकडून झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.