कोल्हापूर : प्रस्तावित साखर नियंत्रण आदेशावर उद्योगाच्या प्रगतीसाठी साखर उद्योगाचे दिग्गज एकत्र येऊन सखोल चर्चा केली. ‘चीनीमंडी’ तर्फे आयोजित राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये साखर उद्योगाच्या दिग्गजांनी भाग घेतला.
या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि ज्येष्ठ अभ्यासक पी.जी.मेढे, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक विजय औताडे, दत्त- शिरोळ साखर कारखान्याचे एम.व्ही. पाटील, जेके ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष जितुभाई शहा, ‘चीनीमंडी’चे फाउंडर, सीईओ उप्पल शहा, आणि को- फाउंडर, डेप्युटी सीईओ हेमंत शहा आदी दिग्गजांनी मते मांडली.
साखर उद्योगाचे नियंत्रण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा कायदा परिपूर्ण असावा, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी साखर उद्योगाशी संबधित प्रत्येक संघटनांच्या पातळीवर अभ्यास सुरू आहे. या नव्या मसुद्यामुळे देशातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या साखर उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर साखर, इथेनॉल आणि संबंधित उद्योगांशी संबधित देशातील सर्वात मोठे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ‘चीनीमंडी’तर्फे (ChiniMandi.com) साखर नियंत्रण आदेश १९६६ च्या साखर नियंत्रण आदेश २०२४ या नव्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी खास ‘राऊंड टेबल कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये साखर उद्योगातील विविध तज्ञांनी अभ्यासपूर्ण मते मांडली.त्यामध्ये देशातील साखरेचे उत्पादन, विक्री, पॅकेजिंग, आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, विक्रीसाठी जारी करण्यात येणारा कोटा, वाहतूक, साखरेची आयात- निर्यात याबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी झालेल्या चर्चेत गुरुदत्त शुगरचे सीएमडी माधवराव घाटगे, राहुल घाटगे,सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील, अरिहंत शुगरचे सीईओ आर.के.शेट्टी, अथणी शुगरचे रवींद्र देशमुख यांच्यासह राज्यातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊंड टेबल कॉन्फरन्स चे फोटो बघन्यासाठी इथे क्लिक करा