केंद्रातील नवीन सरकार ने पहिला निर्णय घेतला शेतकरी हिताचा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यासाठीच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली. या निधीचा फायदा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना होईल. अंदाजे २०,००० कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वितरित केले जातील. या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाइल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here