अमेरिकेने उचलला नवे पाऊल, भारतीय बाजारपेठेतही उलथापालथ शक्य

नवी दिल्ली : एकीकडे जगभरात बँकिग क्षेत्रातील दिवाळखोरीच्या घडामोडींनी मंदीची शक्यता वाढली आहे. या संकटादरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. यूएस फेडरलने बुधवारी रात्री व्याजदरात २५ बेसिस पॉईंट अथवा ०.२५ टक्के वाढीची घोषणा केली. या नव्या वाढीनंतर आता फेडरलचे व्याजदर जवळपास १५ वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. या घडामोडींचे परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळाले.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युएस फेडरलच्या नव्या व्याज दरवाढीनंतर आता ४.७५ टक्यांवरून हा दर ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २००८ मध्ये लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीपूर्वी फेडरलचे व्याजदर याच स्तराजवळ होते. आणि बँकिंग क्षेत्र बुडाल्याने जगाला मंदीचा सामना करावा लागला होता. अशीच स्थिती आता दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक बुडाली. फक्त अमेरिकेचा नव्हे तर युरोपातही बँकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. तेथे क्रेडिट सुईस बँकेची स्थिती बिकट झाली आहे. या बँकांच्या दिवाळखोरीने लाखो ग्राहकांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक गुंतवणुकादारांना आपले पैसे अडकल्याने बिकट स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here