पानीपत : डाहर येथील नव्या साखर काखान्यात रिफाईंड साखरचे उत्पादन सुरू झाले आहे. रविवारपासून येथे साखर पॅकिंग करून बॅग गोदामांना पाठविण्यात येत आहेत. प्लांटची ऊस गाळप क्षमता प्रती दिन २० हजार क्विंटलवरुन ३० हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्लांट सलग ९० तास सुरू आहे. लवकरच हा प्लांट ५० हजार क्विंटल प्रती दिन क्षमतेने चालविण्यात येणार आहे. आतापर्यंत ९५ हजार क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. प्लांटबाबत अधिकाऱ्यांना काही नव्याने योजना तयार केल्या आहेत.
याबाबत जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे सर व्यवस्थापक नवदीप सिंह यांनी सांगितले की, नव्या कारखान्यात रिफाईंड साखर उत्पादन सुरू झाले आहे. पॅकिंग टँक पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत आहे. सध्या ३० हजार क्विंटल प्रती दिन क्षमतेने गाळप होत आहे. लवकरच याची क्षमता वाढवली जाईल. या युनिटच्या सुशोभिकरणाचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. सहा हजार झाडे लावली जाणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी व्हॉलीबॉल मैदान असेल. ज्या पद्धतीने जुन्या कारखान्यात पेट्रोल पंप होता, तशाच पद्धतीने तो नव्या कारखान्यातही असेल. पेट्रोल, डिझेल सह सीएनजीसाठीही आमचे प्रयत्न आहेत. महसूल वाढवणे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, असे नवदीप सिंह म्हणाले.