ब्राझील: देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की,ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 19,000 पेक्षा अधिक नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. हे एक दिवसापूर्वीच्या तुलनेत कमी आहे. जेव्हा 23,000 पेक्षा अधिक केस समोर आल्या होत्या. ब्राजीलमद्ये कोरोनारुग्ण आता हळूहळू कमी होत आहेत.
मंत्रालयाने सांगितले की, 19,373 केससह एकूण संख्या आता 3,359,570 झाली आहे. मृत्युच्या संख्येमध्ये 684 रुग्णांची वाढ झाली आहे.
ब्राझीलमध्ये 2.47 मिलियनपेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च ला कोरोनाला महामारी घोषित केले होते. संघटनेच्या नुसार, जागतिक कोरोना मृत्युचा आकडा 767,000 च्या वर गेला आहे. तर जगभरात कोरोनाची संख्या 21.5 मिलियनपेक्षा अधिक आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.